निळवंडेचे कालवे पुर्ण करुन पाणी देणे हाच आपला ध्यास – आ.थोरात

संगमनेर -अनेक अडचणींवर मात करीत आपण निळवंडे धरण पुर्ण केले. अनेकांनी अडथळे आणले. आज अनेक जण निधी आल्याच्या घोषणा करीत आहे. कालवे कामात कुणीही राजकारण आणू नये. शिर्डी व कोपरगांवसाठी नाशिकच्या धरणातून पाणी द्यावे. तळेगांव पटयासह दुष्काळी भागाला कालवे पुर्ण करुन लवकरात लवकर पाणी देणे हाच आपला ध्यास असून त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

चिंचोली गुरव येथे पश्‍चिम भाग सह.सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर रामदास पा.वाघ, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे,बाबा ओहोळ,अविनाश सोनवणे, हौशिराम सोनवणे,साहेबराव गडाख, भारत मुंगसे,सरपंच सौ.प्रमिलाताई बर्डे, तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी, शाखाधिकारी चांगदेव ढेपे,चेअरमन प्रकाश सोनवणे, उपसरपंच संपतराव सोनवणे, व्हा.चेअरमन गोरक्षनाथ सोनवणे, योगेश सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

यावेळी आ.थोरात म्हणाले की,अनेक अडचणींवर मात करीत आपण निळवंडे धरण पुर्ण केले.  आधी पुनर्रवसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न राबविला. या कामी मधुकरराव पिचड यांनी मोलाची साथ दिली. निळवंडे धरणाचे अनेक शत्रु आहेत. आपण प्रामाणिकपणे हे धरण पुर्ण केले, कौठे कमळेश्‍वर,पिंपळगांव कोंझिरा या मोठ्या बोगद्यांसह काही भागात कालव्यांचे काम पुर्ण केले. मंत्री मंडळात असतांना सतत आग्रह करुन निळवंडेसाठी निधी मिळविला. 2014 ला 100 कोटी निधी आणला.मात्रमागील 4 वर्षात 1रुपायाचाही निधी या धरणाला मिळाला नाही.आता निवडणुका आल्याने निधीच्या घोषणा सुरु झाल्या आहे. दुष्काळी भागाला निळवंडे धरणाचे पाणी देणे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन एकत्र यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)