निलेश लंके प्रतिष्ठाणने कुस्तीपटूला घेतले दत्तक 

सुपा – निलेश लंके प्रतिष्ठानने भांडगाव (ता. पारेनर) येथील कुस्तीपटू माधुरी साहेबराव खरमाळे हिला दत्तक घेतले आहे. भांडगावच्या महिला कुस्तीपटू माधुरी खरमाळे यांच्या जिद्धीचे खरोखरच कौतुक करावे, तितके कमीच आहे. मुलीला कुस्तीची आवड आहे. तिची आवड जोपासण्यासाठी तिच्या पालकांनी हालाखीच्या परिस्थितीतही तिला काही कमी पडू दिले नाही. त्यांनी अतोनात संघर्षातून मुलीचे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न केले. आजवर माधुरीनेही जामखेड, मुंबई, पुणे, कर्जत येथे विविध स्पर्धांमध्ये मैदाने गाजवून तीच्या कलागुणांची चुणूक दाखवून दिली. आता तिचे ध्येय राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा जिंकण्याचे. केवळ आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने गुणवंत महिला कुस्तीपटू मागे राहू नये, या हेतूने निलेश लंके प्रतिष्ठाणने तिला दत्तक घेतले आहे. तिच्या खर्चासाठी त्यांनी तिला 5 हजार रुपयांचा धनादेशही सुर्पूद केला.
यावेळी माधुरी खरमाळेसह शिवसेना उप तालुका प्रमुख दादा शिंदे, भोयरे गांगर्डाचे उपसरपंच दौलतराव गांगड, बाळासाहेब दळवी, नंदू सोंडकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)