निलम ढापरे यांची पुरातत्व विषयात पीएचडी

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) – येरवळे, ता. निलम सुभाष ढापरे यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या अभिमत विद्यापीठातून पुरातत्व विषयाची पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. निलम ढापरे यांनी प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व या विभागातून संशोधन प्रबंध सादर केला होता. यासाठी आर्किओलॉजी ऑफ जुन्नर विथ स्पेशल इंम्फसिस ऑन अर्ली हिस्ट्रॉरीक फेज हा प्रबंधाचा विषय निवडला होता. यांना डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ. वसंत शिंदे, माजी मुख्याध्यापक भिमराव ढापरे, पंडित ढापरे यांचे मार्गदर्शन लाभले. कराड येथील वायझेड टीव्हीचे संपादक नितीन धापरे यांची ती बहीण आहे. या यशाबद्दल डॉ. ढापरे यांचे विविध स्तरामधून अभिनंदन होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)