निर्यात वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता 

नवी दिल्ली, दि. 27 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने नॅशनल एक्‍स्पोर्ट इन्शुरन्स अकाऊंट ट्रस्टला 1,040 कोटी रुपये अनुदानपर मदत द्यायला मंजुरी दिली आहे.
या निधीचा वापर 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षात केला जाईल. वर्ष 2017-18 साठी 440 कोटी रुपये याआधीच मिळाले आहेत. वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठी एनईआयएला प्रत्येकी 300 कोटी रुपये दिले जातील. या निधीमुळे एनईआयए देशातील धोरणात्मक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या निर्यात प्रकल्पांना अर्थसहाय्य पुरवण्यास समर्थ असेल. सरकारला जागतिक व्यापारात भारताचा वाटा वाढवायचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)