निर्यात वाढविण्याशिवाय पर्याय नाही – प्रभू 

राष्ट्रीय उत्पन्नातील निर्यातीचा वाटा वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील 

मुंबई – देशाचे आयात- निर्यात गुणोत्तर सुधारण्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणाचा भाग म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात परकीय व्यापाराचे योगदान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. रसायने, प्लॅस्टिक्‍स, बांधकाम, खाणकाम आणि पूरक उद्योग यांच्यासाठी स्त्रोत कार्यक्रम असलेल्या कॅपइंडियाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. प्लेक्‍सकोन्सिल, केमेक्‍सिल, कॅपेक्‍सिल, शेफेक्‍सिल या चार एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्सनी हे आयोजन केले आहे.

कॅपइंडियाची तिसरी आवृत्ती वाणिज्य विभाग, भारत सरकारच्या अंतर्गत रसायने व पेट्रोकेमिकल्स विभाग व भारत सरकारच्या पाठिंब्याने तसेच प्लेक्‍सकोन्सिल, केमेक्‍सिल, कॅपेक्‍सिल, शेफेक्‍सिल यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. रसायने, प्लॅस्टिक्‍स, बांधकाम आणि खाणकाम उद्योग आणि संबंधित उत्पादनांसाठी हा सर्वात मोठ्या स्त्रोत आणि नेटवर्किंग कार्यक्रमांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. भारताच्या उत्पादनविषयक क्षमता आणि कार्यक्षमता यांचे प्रदर्शन घडवणारे हे विस्तृत मेक इन इंडिया प्रदर्शन 22 ते 24 मार्च 2018 दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे देशाच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता दर्शवून भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंची निर्यात वाढवण्याचा हेतू आहे. हे तीन दिवसीय प्रदर्शन 18 हजार चौरस मीटर्स अंतरात वसलेले असून त्यामध्ये 700 पेक्षा जास्त उत्पादक/निर्यातदार शेकडो उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

त्यात औद्योगिक आणि शेतीसाठीचा कच्चा माल, ग्राहकोपयोगी वस्तू, पॅकेजिंग वस्तू, प्लॅस्टिक प्रक्रिया यंत्रणा आणि बांधकाम साहित्य, खाणकाम उत्पादने यांचा समावेश आहे. कॅपइंडियामध्ये जगभरातील 400 आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून त्यांना सरकारच्या एमएआय योजनेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येत असलेल्या खरेदीदार- विक्रेते सभांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जात आहे. भारतीय उत्पादक- निर्यातदार आणि त्यांचे लक्ष्य असलेले देश यांच्यातील व्यापारी नातेसंबंध जपण्यासाठी व महत्त्वाच्या निर्यात क्षेत्रांना चालना देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये दहा हजार प्रेक्षक सहभागी होणार असून त्यात देशांतर्गत आणि परदेशी खरेदीदार, आंतरराष्ट्रीय एजंट्‌स आणि वितरक यांचा समावेश आहे. त्यांना भारतीय निर्यातदार, कच्चा माल व साठवणुकीचा वापर करणारे वापरकर्ते, खासगी कंपन्यांचे खरेदीदार, व्यापारी निर्यातदार, औद्योगिक आणि मार्केटिंग सल्लागार, केंद्रीय आणि राज्य सरकार विभाग आणि एजन्सीज यांच्याकडून बाजारपेठ प्रतिनिधित्व हवे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)