निर्यात वाढविणाऱ्या फिलीप्सचा प्रकल्प विस्तार 

नवी दिल्ली: फिलीप्स कंपनीने मेक इन इंडिया मोहीम हाती घेत भारतासाठी आणि निर्यातीसाठी भारतात उत्पादन वाढविण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ भारतात उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हणाले.
आरोग्यसेवा क्षेत्रातील संशोधनासाठी फिलीप्स आरोग्य तंत्रज्ञान कंपनीमधील फिलीप्स आरोग्य तंत्रज्ञान सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
उत्पादन विकसित करण्यापासून उत्पादन निर्मितीपर्यंत केंद्राने आता काम सुरू केले आहे. पारंपरिक उत्पादन करण्याव्यतिरिक्त नवीनीकरण, अभियांत्रिकी, विपणन, ग्राहक सेवा, खरेदी, गुणवत्ता आणि नियमित सेवा यांचाही समावेश केला आहे. जगभरातील 90 पेक्षा अधिक देशांमध्ये केंद्राने 1000 प्रणाली वितरित केल्या आहेत.
यातील बऱ्याच यंत्रणा भारतात वितरीत केल्या असून त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. आगामी काळात भारतातील उत्पादन आणखी वाढविण्यासाठी पुण्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे. पुण्यात विकसित झालेली उत्पादने इतर देशातही तयार करण्यात येतात, असे कंपनीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)