निर्यातीत अपेक्षेइतकी वाढ नाही 

नवी दिल्ली – निर्यातीत एप्रिलमध्ये 5.17 टक्‍के वाढ होऊन ती 25.91 अब्ज डॉलरवर पोचली असून, आयातीतही 4.60 टक्के वाढ होऊन ती 39.63 अब्ज डॉलरवर गेली आहे. निर्यात अपेक्षेइतकी होत नसल्यामुळे व्यापारी तूट 13.72 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत या वर्षी एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची आयात 41.5 टक्‍क्‍याने वाढली आहे. एप्रिलमध्ये कच्च्या तेलाची आयात 10.41 अब्ज डॉलर आहे. बिगरतेल आयातीत 4.3 टक्के घसरण होऊन ती 29.21 अब्ज डॉलर आहे.

अभियांत्रिकी, रसायने आणि औषधे या क्षेत्रातील निर्यात अनुक्रमे 17.63, 38.48 आणि 13.56 टक्के वाढली आहे. याचवेळी पेट्रोलियम उत्पादने, कार्पेट, रत्ने व दागिने आणि लोहखनिजाची निर्यात घसरली आहे. सोन्याची आयात एप्रिलमध्ये 33 टक्‍क्‍याने कमी होऊन 2.58 अब्ज डॉलरवर आली. मार्चमध्ये निर्यातीत 0.66 टक्के घसरण होऊन ती 29.11 अब्ज डॉलरवर आली होती. आता सरकारने पिर्यात वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले आहेत. परंपरागत बाजाराबरोबरच ईतर देशातही निर्यात वाढविली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)