निर्माल्यातून खतनिर्मीतीचा सातारा पालिकेचा उपक्रम

प्रकल्पातून तयार होणाऱ्या खताला हरित ब्रॅंड उपलब्ध

(गुरूनाथ जाधव )
सातारा-  पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना निर्माल्याच्या माध्यमातून खत निर्मीती करण्याचा विधायक उपक्रम सातारा नगरपरिषद करत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडई या ठिकाणी सर्वकचरा वेचक श्रमीक संघ व सातारा नगरपरिषदेच्या वतीने सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्प चालविला जात आहे. या सेंद्रीय खत प्रकल्पातून तयार होणाऱ्या खताला हरित ब्रॅंड उपलब्ध झाल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

-Ads-

शहरातील विविध गणेश मंडळांना निर्माल्यदान संकल्पना राबविण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते. त्याला शहरातील मंडळांचा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यापूर्वी निर्माल्य गणेश विसर्जनाच्या तळयांमध्ये अथवा नदीत टाकण्यात येत होते. त्यामुळे प्रदूषण देखील होत असे. निर्माल्य संकलनामुळे त्यातुन खतनिर्मीतीचा उपक्रम आस्था संस्थेचे विजयकुमार निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विविध मंडळे तसेच गणेश विसर्जनाच्या ठिकाणी जमा करण्यात आलेल्या निर्माल्यातून खतनिर्मीतीचा उपक्रम सलग 2 वर्षे केला जात आहे. या सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्पाची क्षमता 20 टनापर्यंतची आहे. यावर्षी किमान 3 ते 4 टन खत निर्मीती होईल अशी शक्‍यता असल्याची माहिती विजयकुमार निंबाळकर यांनी दिली.

शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच जर त्याचे विलगीकरण व त्यावर प्रक्रिया केल्यास कचरा वाहतुकीच्या खर्चात बचत होणार आहे. यामध्ये भाजी मंडईचे सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्प हे आदर्श उदाहरण आहे. नगरपरिषदेच्या वाहनातून शहरातून आणलेल्या निर्माल्याचे विलगीकरण केंद्रात होते. यामधील प्लॅस्टिक वगळता इतर सर्व निर्माल्य स्रेडर मशीनच्या साह्याने बारीक करून कचरा प्रकल्पात टाकण्यात येते. त्यामध्ये कल्चर टाकून साधारणत: दोन महिन्यात खत तयार होते. सर्व कचरा वेचक श्रमीक संघाचे अध्यक्ष प्रकाश भिसे व नगरपरिषदेच्या कर्मचारी व सहकारी यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. सातारा शहरात विविध ठिकाणी पालिकेच्यावतीने सेंद्रीय खतनिर्मीती प्रकल्प राबविणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे असेही निंबाळकर म्हणाले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)