निर्माल्याचे होणार खत; 676 टन संकलीत

पुणे : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत महापालिका प्रशासनाकडून शहरातील 210 विसर्जन ठिकाणी तब्बल 673 टन निर्माल्य संकलन केले आहे. त्यात 579 टन निर्माल्य महापालिकेने तर 97 टन निर्माल्य स्वच्छ संस्थेच्या मदतीने संकलीत केले आहे. या निर्माल्याचे खत केले जाणार असून ते महापालिका उद्यानांसाठी वापरण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

भाविकांनी तसेच गणेश मंडळांनी निर्माल्य नदीत न टाकता नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या निर्माल्य कलशांमध्ये टाकावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील गणेश मंडळे आणि नागरिकांची जनजागृती करण्यात येत होती. गेल्या काही वर्षांपासून पालिकेकडून हा उपक्रम राबविला जात आहे. त्याला प्रतिसाद देत भाविकांकडून निर्माल्य नदीमध्ये न टाकता पालिकेच्या वतीने विसर्जनाच्या 43 ठिकाणी कलश तर 160 निर्माल्य कंटेनर ठेवण्यात आले होते. तसेच महापालिकेकडून संबंधित ठिकाणी याबाबतचे सूचना फलकही लावण्यात आले होते. या शिवाय, स्वयंसेवी संस्था तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत होती. त्यामुळे या दिवसांत सुमारे 676 टन निर्माल्य संकलीत करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)