निर्मला ढोले यांना शरद भूषण पुरस्कार

माळशिरस- पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस येथील अंगणवाडी सेविका निर्मला विलास ढोले यांना शरद भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्मला ढोले यांनी अंगणवाडीमध्ये विविध उपक्रम राबविले आहेत. बोलक्‍या चित्रांच्या माध्यमातून त्या मुलांना शिक्षण देतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसचे उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, दत्तात्रय डोंबाळे, सारिका यादव, अनिसा शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)