निर्भिड व स्वाभिमानी पत्रकारांचा सन्मान होतोच – गडाख

भातकुडगाव फाटा: देशामध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे,शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरत आहे, शेती मालाला योग्य बाजारपेठ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे, पत्रकारांनी स्वाभिमान व निर्भिडपणे समाजासमोर प्रश्‍न मांडून ते सोडवावे असे प्रतिपादन माजी खासदार तुकाराम गडाख यांनी व्यक्त केले.
भातकुडगाव फाटा येथे कामधेनु सहकारी बिगर शेती, दुग्ध व्यवसाय पतसंस्था, बक्तरपुर यांच्या वतीने दिला जाणारा पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार 2019 या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने अध्यक्षपदावरून खासदार गडाख बोलत होते.

यावेळी महंत सुनिलगिरी व पोलीस अधिक्षक गवारे यांच्या हस्ते पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार रवींद्र उगलमुगले यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महंत सुनीलगिरी महाराज, शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ.क्षितीज घुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, प्रवीण म्हस्के, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. चेअरमन मारूतराव जाधव, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या अध्यक्ष एकनाथ काळे, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, अण्णासाहेब दुकळे, अण्णासाहेब शिंदे, वाय.डी.कोल्हे, देवटाकळी चे सरपंच अशोक मेरड, अशोक दुकळे, रवींद्र लोढे, कडुबाळ जाधव, भाऊसाहेब सामृत,यशोदास वाघमारे, भाऊराव फटांगडे, सचिन काळे, बापूसाहेब लोढे, व्यापारी संघटनेचे राजेश लोंढे, मुरलीधर दुकळे, राजेंद्र आढाव, विठ्ठल आढाव यांच्यासह विविध स्तरातील सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे बाळासाहेब काळे यांनी केले, तर आभार रवींद्र मडके यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाराम आगळे यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)