निर्भिड पत्रकारितेसाठी वाचकांचा पाठिंबा हवा

ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन यांचे मत

पुणे – “निर्भिड पत्रकारितेसाठी वाचक-श्रोते यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. प्रश्न केवळ माध्यमे जगण्याचा नाही तर, जनतेला सत्य समजले पाहिजे आणि सत्य समजून घ्यायचे असेल तर निर्भिड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करावयास हवे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन यांनी शुक्रवारी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केसरी-मराठा ट्रस्टच्या वतीने सिध्दार्थ वरदराजन यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. महापौर मुक्‍ता टिळक, विश्‍वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्‍वस्त डॉ. प्रणती टिळक, विश्‍वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होते. कै. जयंतराव टिळक स्मृती पुरस्काराने संस्था आणि व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले.

वरदराजन म्हणाले, “माध्यमे आणि पत्रकारितेला दोन बाजू असतात. ज्या लोकशाही आणि त्यांचे हक्‍क दर्शवतात. वृत्तवाहिन्यांवर ओरडून देशाला अमुक-तमुक गोष्टी माहिती होणे आवश्‍यक आहे, असे सांगतात. मात्र, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि सरकार काय करत आहे, हे देशाला कधीच माहिती होणे गरजेचे नसते का?’ असा प्रश्‍न यावेळी वरदराजन यांनी उपस्थित केला. तसेच, पत्रकाराकडे प्रश्‍न विचारण्याच्या कलेसह, स्वतःचे मतदेखील मांडण्याचे कौशल्य असणे आवश्‍यक असल्याचे वरदराजन यांनी आवर्जून सांगितले. सरकारविरोधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला जात असल्याचे सांगत वरदराजन यांनी काही उदाहरणे दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)