निर्भया फंड अंतर्गत मुंबईसाठी 225 कोटी

नवी दिल्ली – देशातील प्रमुख आठ शहरांमधील महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊले उचलत निर्भया फंड अंतर्गत 2 हजार 919 कोटी 55 लाख रूपयांचा निधी वितरीत केला आहे. यात मुंबई शहरासाठी 225 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने महिलांसाठी सुरक्षित शहर बनविण्यासाठी देशातील प्रमुख आठ शहरांची निवड करण्यात आली. या शहरांमध्ये महिलांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत एकूण अंतर्गत 2 हजार 919 कोटी 55 लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला. मुंबईसाठी 225 कोटींचा निधी देण्यात आला असून मुंबईसह, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता, बेंगलुरू, हैद्राबाद आणि लखनऊ या शहरांची निवड करण्यात आली.

-Ads-

निर्भया फंड अंतर्गत मुंबई शहरातील गुन्हे प्रवण भागात जीआयएस मॅपींग सेवा उभारण्यासाठी सीसीटीव्ही कॅमरे लावण, गुन्हे तपास अधिकारी व विधी विभागाच्या अधिका-यांना प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागातील महिलांवरील शारीरिक अत्याचारांच्या गुन्हयांमध्ये पोलीस दिदि कार्यक्रमास सक्षम करण्यात येते. तसेच माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)