निर्भया प्रकरणावरून छत्तीसगडच्या शिक्षिकेचा मुलीना अजब सल्ला

रायपूर: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणावर आता छत्तीसगडमधील एका शिक्षिकेने वाद ओढावून घेणारं वक्तव्य केले आहे. तोडके कपडे परिधान करणे आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणे निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करते, असे या शिक्षिकेचे म्हणणे आहे. इतकंच नाही, तर निर्भया प्रकरणात निर्भयाची कशी चुकी होती, हे विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचाही त्या शिक्षेकेने पूर्ण प्रयत्न केला आहे.
रायपूरच्या केंद्रीय विद्यालयातील बायोलॉजीच्या शिक्षिकेने तिच्या वर्गाला काऊंन्सिलिंग सेशनमध्ये बदलून मुलांसमोर मुलींना हा अजब सल्ला दिला आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे निर्भया प्रकरण घडायला चालना देतात. ज्या मुली रात्री बाहेर फिरतात त्यांच्याबरोबर अशा घटना घडू शकतात, असे या शिक्षिकेने म्हटले. दरम्यान, शिक्षिकेच्या या वक्तव्याने चिडलेल्या एका विद्यार्थीनीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक भगवान दास अहीर यांना भेटून शिक्षिका स्नेहलता शंखवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुलींच्या जिन्स पॅण्ट घालण्यावर व लिपस्टिक लावण्यावरही या शिक्षिकेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान तक्रारीमध्ये शिक्षिकेच्या वक्तव्यांची ऑडिओ क्लिपही देण्यात आली आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)