निर्बीजीकरणानंतर श्‍वानांचे छायाचित्र काढा

पिंपरी – शहरातील भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशूवैद्यकीय विभागामार्फत भटक्‍या श्‍वानांवर केल्या जाणाऱ्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेनंतर या श्‍वानांची ओळख पटावी, याकरिता पुराव्या दाखल त्यांचा फोटो काढून त्यावर एखादे मार्किंग करून हे रेकॉर्ड जतन करावे, असा आदेश स्थायी समितीने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (गुरुवारी)पार पडली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेतर्फे लातुर येथील मेसर्स सोसायटी फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल आणि नवी मुंबईतील ऍनीमल वेल्फेअर असोसिएशन यांना शहरातील श्‍वानाचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका देण्यात आला होता. त्या कामाची मुदत संपली होती. त्याला स्थायी समितीने तीन महिने मुदतवाढ दिली आहे. त्यासाठी 24 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. या संस्थेमार्फत पुढील तीन महिन्यात 3600 श्‍वानांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे. दर महिन्याला 1200 श्‍वानांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
शहरातील भटक्‍या श्‍वानांच्या वाढत्या संख्येबाबत स्थायी समिती सभेत जोरदार चर्चा झाली. सदस्य विलास मडिगेरी म्हणाले की, शहरात भटक्‍या श्‍वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, भटक्‍या श्‍वानांचे नियमितपणे निर्बिजीकरण केले जात असल्याची माहिती पशूवैद्यकीय विभागाकडून दिली जात आहे. परंतु, संख्या मात्र अनियंत्रीत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. न्यायालयाचा आदेशानुसार, भटक्‍या श्‍वानाला मारता येत नाही. तसेच अधिवास हिरावून न घेता, निर्बीजीकरण केल्यानंतर पकडलेल्या ठिकाणीच त्या श्‍वानाला सोडावे लागत आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश
गेली वर्षभरात ठेकेदार संस्थांकडून शहरातील 14 हजार श्‍वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. शहरातील भटक्‍या श्‍वानांच्या निर्बीजीकरणाच्या ठेक्‍याला तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुढील काळात प्रत्येक महिन्यात 1200 प्रमाणे एकूण 3600 श्‍वानांचे निर्बीजीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील भटक्‍या श्‍वानांची संख्या कमी होत नसल्याने, आतापर्यंत नेमक्‍या किती श्‍वानांचे निर्बिजीकरण केले, त्याची सविस्तर माहिती देण्याचा आदेश स्थायी समितीने दिला आहे. तसेच आतापर्यंत निर्बिजीकरण केलेल्या श्‍वानांचे रेकॉर्ड जतन करुन, ते पुढील साप्ताहिक सभेत स्तायीला सादर करण्याचे आदेश पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांना देण्यात आले आहेत.

प्रभागातील भटक्‍या श्‍वानाला निर्बिजीकरणासाठी पशूवैद्यकीय विभागाने नेले होती. त्यांना पुन्हा याच परिसरात सोडून दिल्यानंतर या श्‍वान मादीला पुन्हा पिल्ले झाली आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाकडून भटक्‍या श्‍वानाचे निर्बिजीकरण केले जात नसल्याचे, स्पष्ट होत आहे.
– गीता मंचरकर, सदस्या, स्थायी समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)