वॉशिंग्टन – अमेरिकेने आणि इराण आणि रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे भारतापुढे पेच निर्माण झाला आहे. तथापी या विषयावर आम्ही लवकरच तोडगा काढू असे भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी म्हटले आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत भारताला इराणकडून होणारी तेल आयात थांबवावी लागणार आहे. त्यामुळे भारतापुढे पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा निर्णय घेतला नाहीं तर भारताचे अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडण्याची शक्‍यता आहे.

त्या विषयी बोलताना सरना म्हणाले की या आधीही अनेक गंभीर प्रसंग निर्माण झाले असतानाही भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध टिकून राहिले आहेत. त्यामुळे या विषयावर तोडगा काढणे आम्हाला अशक्‍य नाहीं. भारत आणि अमेरिका हे दोघे मिळून यावर तोडगा काढतील असे ते म्हणाले. या आधीही आम्ही अशा प्रकारचे गुंतागुंतीचे विषय सामंजस्याने सोडवले आहेत असे ते म्हणाले.

भारताने इराण मधील चाबहार बंदराच्या विकासात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावरही या निर्बंधांचा परिणाम होईल काय असे विचारता सरना म्हणाले की हे बंदर वाहतुकीला खुले व्हावे अशी इच्छा अमेरिकेनेही व्यक्त केली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेच्यावेळीही या विषयावर चर्चा झाली आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)