निर्देशांचे पुनर्विलोकन करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती – पाटील

मुंबई- दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मानवी थर रचण्यात निर्बध नसून गोविंदाचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशाचे पुनर्विलोकन करण्याची विनंती केंद्र सरकारला केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

सुरक्षेच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजना आणि ध्वनीप्रदुषणाच्या नियमांची काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे पुनर्विलोकन करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करण्यात आली असल्याचेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)