निर्देशांक वाढून गेला 27 हजारावर

मुंबई – इंडसइंड बॅंक आणि साऊथ इंडियन बॅंकेने बऱ्यापैकी नफा कमावलेले ताळेबंद जाहीर केले. त्याचबरोबर अर्थमंत्री अरूण जेटली यानी जीएसटीबाबात सरकार आग्रही असल्याचे जाहीर केले. आशियायी बाजारातूनही सकाळी सकारात्मक संदेश आल्यानंतर शेअर बाजारात आज बऱ्यापैकी खरेदी होऊन निर्देशांक वाढले. मात्र अमेरीकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय घोषणा करतात याकडे लक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी माहीती तंत्रज्ञान कंपन्याच्या शेअरकडे दूर्लक्ष केले.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 240 अंकानी वाढून 27140 अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 92 अंकानी वाढून 8380 अंकावर बंद झाला. कालही सेन्सेक्‍स वाढला होता. सेन्सेक्‍स सध्या दोन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आहे.
सरकार आता काही आठवड्यात अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत थोडीशी मंदी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात सरकार काही भरीव घोषणा करण्याची शक्‍यता काही गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्याचबरोबर जीएसटीबाबतही उद्योग क्षेत्र आशावादी आहे. अमेरीकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला पदभार स्विकारणार आहेत. त्या अगोदर ते माध्यमाशी आज बोलणार आहेत. त्यानी प्रचारात बचावात्मक आर्थिक धोरण राबविण्याचे संकेत दिले आहेत. ते व्हीसा धोरणावर काय भाष्य करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे माहीती तंत्रज्ञान क्षेत्र आज दूर्लक्षित राहीले.  मात्र काल इंडसइंड बॅंकेने नफ्यात 29 टक्के वाढ झाल्याचे जाहीर केले. नोटाबंदीचा बॅंकीग क्षेत्रावर फारच परिणाम होईल असे समजले जात होते. मात्र तरीही या बॅंकेला चांगला नफा झाला आहे. इतर बॅंकाचेही ताळेबंद चांगले असतील या आशेने काही गुंतवणूकदरांनी बॅंकाच्या शेअरची खरेदी केल्यामुळे आज सेन्सेक्‍स 27 हजाराच्या वर जाऊ शकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)