निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर झेपावले

फेडरल रिझर्व्ह व्याजदरात जास्त वाढ करणार नसल्याचा परिणाम

मुंबई: फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची घाई करणार नाही तर टप्याटप्याने व्याजदरात वाढ करणार आहे. या कारणामुळे जगातिक बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही सोमवारी जोरदार खरेदी होऊन निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर झेपावले.

बॅंका, धातू आणि उर्जा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची आज मोठया प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. चीनने यॉनच्या मूल्यांकनासाठी नवे सूत्र लागू करण्याचे जाहीर केल्यामुळे आशियायी शेअर बाजारही आज तेजीत होते. देशातील संस्थागत गुंतवणूकदार तर खरेदी करीत आहेतच त्याचबरोबर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी वाढविल्यामुळे निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही वाढत असल्याचे चित्र बाजारात आहे. त्यामुळे आज रिऍल्टी क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.

सोमवारी बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 442 अंकांनी म्हणजे 1.16 टक्‍क्‍यांनी वाढून 38694 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 134 अंकांनी म्हणजे 1.17 टक्‍क्‍यांनी वाढून 11691 अंकावर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्‍स 84 अंकांनी कमी झाला होता. गेल्या पाच महिन्यात प्रथमच निर्देशांक एकाच दिवसात एवढया मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मोठ्या कंपन्याबरोबरच छोट्या कंपन्याचे शेअर उसळल्यामुळे मिड कॅप 1.07 टक्‍क्‍यांनी तर स्मॉल कॅप 0.70 टक्‍क्‍यानी वाढला.

गेल्या आठवड्याच्या शेवटी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, एकदाच करण्यापेक्षा हळूहळू व्याजदरात वाढ केली तरच अमेरिकेन अर्थव्यवस्थेतील उभारी आगामी काळात कायम राहील आणि रोजगार वाढेल. त्यामुळे अमेरिका आणि आशियायी शेअर बाजार निर्देशांक उंचावले. निर्देशांक फारच वरच्या पातळीवर गेल्यामुळे आता गुंतवणूकदारांचे परिस्थितीवर बारीक लक्ष राहण्याची शक्‍यता वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)