निर्देशांकात मोठी घट

नवी दिल्ली, दि.18- जागतीक बाजारातील घसरणीचे निमीत्त होऊन आज भारतीय बाजारातही मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशाक कमी झाले. अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना काढून टाकले आहे. त्यामुळे अमेरीकन राजकारण ढवळून निघाले आहे. आता ट्रम्प यांच्या उद्योग विषयक निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे अमेरीकन शेअर बजार निर्देशांक कमी झाले.
त्यानंतर लगेच जागतीक बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले. भारतीय शेअरबाजार सध्या विक्रमी पातळीवर आहेत. त्यामुळे सावध राहण्याच सल्ला अगोदरच तज्ञानी दिलेला आहे.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 223 अंकानी कमी होऊन 30434 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 96 अंकानी कमी होऊन 9423 अंकावर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्‍स 470 अंकानी वाढला होता. जागतीक नकारात्मक घडामोडीमुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 731 कोटी रूपयाच्या शेअरची विक्री केली. मात्र काल देशातील संस्थागत गुंतवणूकदरांनी 614 कोटी रूपयाच्या शेअरची खरेदी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)