निर्देशांकांची विक्रमी घोडदौड 

रिझर्व्ह बॅंकेबरोबरच अमेरिका आणि जपानच्या केंद्रीय बॅंकांचे पतधोरण जाहीर होणार असतानाही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून खरेदी चालूच ठेवली आहे. ब्ल्यू चिप कंपन्यांचे नफादायक ताळेबंद गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटत आहेत. 
विनोद नायर 
संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा 
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक चालू असल्यामुळे सकाळी शेअरबाजारात नफेखोरी बळावली होती. मात्र नंतर पुन्हा देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे आज सलग सातव्या दिवशीही निर्देशांकाची विक्रमी घोडदौड चालूच राहिली. रुपया पुन्हा वधारू लागला आहे. त्याचबरोबर एकपाठोपाठ एक ब्ल्यू चीप कंपन्या नफादायक ताळेबंद जाहीर करीत आहे. त्यामुळे आशावादी गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे.
आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलीव्हर आणि इन्फोसिस या कंपन्यानी केले. काही ब्रोकर मात्र बुधवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाची वाट पाहत कुंपनावर बसून होते.आज रिलयन्सच्या शेअरच्या भावात 3.14 टक्‍क्‍यानी वाढ झाल्यानंतर या कंपनीचे बाजारमूल्य भारतातील सर्व कंपन्यात सर्वाधिक झाले आहे. या कंपनीने पहिल्या स्थानावरील टीसीएस कंपनीला मागे टाकले आहे.
मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 112 अंकानी म्हणजे 0. 30 टक्‍क्‍यानी झेपावून 37606 अंकावर विराजमान झाला. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकानी म्हणजे 0.33 टक्‍क्‍यानी वाढून 11356 अंकावर बंद झाला.
मोठ्या कंपन्यांबरोबच छोट्या कंपन्यांच्या शेअरी चांगली खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.26 टक्‍क्‍यानी अंकानी तर मिड कॅप 0.33 टक्‍क्‍यानी वाढला. आज उर्जा क्षेत्राचा निर्देशांक 1.89 टक्‍क्‍यानी, रिऍल्टी क्षेत्राचा
निर्देशांक 1.10 टक्‍क्‍यानी, ग्राहक वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 1.01 टक्‍क्‍यानी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.95 टक्‍क्‍यानी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा
निर्देशांक 0.81 टक्‍क्‍यांनी, आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 0.59 टक्‍क्‍यांनी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा
निर्देशांक 0.48 टक्‍क्‍यांनी, तर धातू क्षेत्राचा निर्देशांक 0.48 टक्‍क्‍यनीच वाढला. त्याचबरोबर वाहन आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक काही प्रमाणात वाढले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)