निरोगी सवयी अंगीकारा 

डॉ. प्रदीप गाडगे 
रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात जाऊन ते कोणते तेल वापरतात हे विचारण्यास कचरू नका. वनस्पती तेल हे उत्तर असेल तर ते तुम्हाला अनुकूल नाही – ते हायड्रोजनित असू शकते! रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तळलेले पदार्थ टाळा, त्याऐवजी उकडलेल्या पदार्थावर भर द्या. एका अभ्यासानुसार केवळ 46% ग्राहकांना लेबलवरील मजकूर समजतो, तोही थोडासा. त्या लेबलवरील घटकांचे तुम्ही विश्‍लेषण कराल, याची खातरजमा करा. हायड्रोजनेटेड किंवा पार्टली-हायड्रोजनेटेड हे शब्द असतील तर तुम्ही सतर्क व्हा! लाईट किंवा रिडयुस्ड फॅट असे शब्द असलेले पदार्थसुद्धा ट्रान्सफॅटविरहित असतीलच असे नाही. उत्पादक काही वेळा चरबीयुक्त घटक कमी करतात पण हायड्रोजनित चरबीचे प्रमाण तसेच असते. तुम्हाला खात्री नसेल तर असे पदार्थ टाळा.
प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे कमी प्रमाणात सेवन करा : पॅकवर नमूद केलेले प्रमाण हे एका नगासाठीचे असते. समजा, एका बिस्किटाच्या ब्रॅंडवर 1.8 ग्रॅम प्रति नग असे प्रमाण असेल आणि तुम्ही तीन नग खाल्ले तर तर तुम्ही 5.4 ग्रॅम ट्रान्सफॅटचे सेवन करता! अनेक लेबलांवर हायड्रोजेनेटेड व्हेजिटेबल ऑईल असे लिहिलेले असते, पण त्याचे प्रमाण लिहिलेले नसते. हे पदार्थ टाळावेत.
घरचे पदार्थ खा :
तुमच्याकडून चूक होणार नाही. तुमच्या कुटुंबात हृदयविकार झालेल्या व्यक्ती असतील तर तळलेले किंवा भरपूर तेलात तळलेले पदार्थ टाळा. स्वयंपाकासाठी रिफाईन्ड वनस्पती तेल वापरा. तुम्ही एखाद्या अधिक चांगल्या तेलात खोबऱ्याचे किंवा राईचे तेल घालून ते स्वयंपाकासाठी वापरा. त्यामुळे तुम्ही आरोग्याला अपाय न करता पदार्थाला चांगली चव मिळू शकेल.
आरोग्यवर्धक चवी :
परतलेल्या भाज्यांपेक्षा आमटीशी सलगी करा. आमटी करताना तेलाऐवजी टोमॅटोचा गर किंवा चरबीविरहीत दही वापरा. हळूहळू तुमच्या आहारातून तेल काढून टाका. तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल तर कमी तेलात तळण्यास सुरुवात करा, मग परतवण्यास सुरुवात करा, त्यानंतर बास्टिग आणि मग भाजून खा. हे एवढे कठीण नाही. प्रमाणित केलेली सेंद्रिय उत्पादने वापरा. सेंद्रिय नियमावलीनुसार हायड्रोनेजेशनची प्रक्रिया तिथे टाळली जाते.
आरोग्यकारक जीवनशैलीचा :
दररोज किमान 400 ते 500 ग्रॅम तंतुयुक्त ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. पाचक तंतूंमुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. विरघळणारे तंतू पाण्यात जेल तयार करतात आणि आंतड्यांमधील मार्गात आम्ल आणि कोलेस्टरोल यांना बांधून ठेवतात आणि ते शरीरात पुन्हा शोषले जात नाहीत. शेंगदाणेसुद्धा आरोग्यकारक असतात, ते भूक भागवतात, लिपिड पातळीसाठी लाभदायक असतात आणि हृदयाचे ठोके धडधडत ठेवतात. तुम्ही घेत असलेल्या तेलाचे सेवन आणि ट्रान्सफॅटचे सेवन याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे.
स्थूलपणा :
ट्रान्सफॅट ट्रायग्लिसराईड्‌समध्ये परिवर्तीत होतात आणि ते शरीरातील मेदयुक्त तुतीमध्ये साचतात. त्यामुळे ती व्यक्ती स्थूल होते.
मधुमेह : भारतात ट्रान्सफॅटच्या सेवनाचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे होणारा टाईप-2 मधुमेह याबाबत आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये चिंता वाढीस लागली आहे. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार ट्रान्सफॅट रक्तातील शर्करेच्या चयापचय क्रियेत हस्तक्षेप करतात. त्याचप्रमाणे ट्रान्सफॅटमुळे महिलांना वंध्यत्व येऊ शकते, कर्करोग, यकृत व मेंदूच्या कार्यामध्ये अडथळा येणे इत्यादी आरोग्यविषयक समस्याही उद्भवू शकतात, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅटचा मेंदूूतील न्युरोपेप्टाइड्‌स या प्रथिनांवरही परिणाम होतो. त्यामुळे वयाची 65 वष्रे पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या आकलनक्षमतेवर परिणाम होतो.
ट्रान्सफॅटमुळे आरोग्याला अपाय होतो? 
रक्तवाहिन्यांचा हृदयविकार ट्रान्सफॅटमुळे आरोग्यास हितकारक असलेल्या एचडीएल कोलेस्टरॉलऐवजी अपायकारक ठरणाऱ्या एलडीएल कोलेस्टरॉलचे प्रमाण शरीरात वाढते, हे अभ्यासाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅट सेवन 2 टक्‍क्‍यांनी वाढले तर रक्तवाहिन्यांचा हृदयविकार होण्याची शक्‍यता दुपटीने वाढते. याविरुद्ध सॅच्युरेटेड फॅटचे सेवन 15 टक्‍क्‍यांनी वाढले तर हा धोका उद्भवू शकतो. ट्रान्सफॅटमुळे शरीराचे आकारमान वाढण्यास चेतवले जाते. ते हृदयातील पेशींभोवती चिकटते. त्यामुळे हृदयाच्या ठोक्‍यांमध्ये अनियमितता येते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)