निरोगी शरीर आणि व्यायामामुळे बनतात खेळाडू – डॉ. रणवरे

निमसाखर- खेळामध्ये सुयश संपादन करायचे असल्यास अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता उत्तम आहार ,पुरेसा व्यायाम आणि सराव केल्यास निश्‍चितच अनेक खेळाडू तयार होतील, असे मत स्कूल कमिटी चेअरमन डॉ. एन. जी.रणवरे यांनी व्यक्त केले.
निमसाखर (ता.इंदापूर) येथील गुलाबराव मारुतीराव रणवरे इंग्लिश मीडियम आणि प्राथमिक व पूर्व प्राथमिक स्कूलमध्ये कराटे खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेतील कराटे खेळाडू सायली सचिन चव्हाण आणि स्वराज सचिन चव्हाण या बंधू-भगिनींनीचा मुंबई (नायगाव) येथे ऑल इंडिया ओपन कराटे पॅंथर कप चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ज्युनियर गट काता व कुमेत या प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. या खेळाडूंची नेपाळ येथे पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या भावंडांचा आणि त्यांचे प्रशिक्षक आशिष डोईफोडे यांचा सन्मान संस्थेचे विश्वस्त विजयसिंह रणवरे यांच्या हस्ते करण्यात आला. निमसाखरच्या नूतन सरपंच संगीता लवटे यांना संस्थेच्या वतीने डॉ. एन. जी. रणवरे आणि संस्थेचे सचिव रवींद्र रणवरे यांनी सन्मानित केले. या कार्यक्रमास इंदापूर तालुका पंचायत समिती माजी उपसभापती जयकुमार कारंडे, नंदकुमार रणवरे, सुदर्शन रणवरे, संजय रणवरे, लालासाहेब चव्हाण, नवनाथ बागल, सी. बी.बोंद्रे, एस. बी. किसवे, संभाजी रणवरे यांसह आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक पंकज खिल्लारे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)