आरोग्यवर्धक आवळा…

रोज रात्री आवळकाठी चूर्ण घेतले असता मल प्रवृत्ती साफ होते. त्रिफळा चूर्णात आवळकाठी एक भाग आहे. आवळकाठी चूर्ण रोज त्वचेला लावून आंघोळ केल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्वचा स्वच्छ होते. चेहऱ्यावरचा काळेपणा व तेलकटपणा घालवण्यासाठी आवळकाठी चूर्ण दुधात भिजवून फेसपॅक करावा. शिकेकाईच्या मसाल्यात एक घटक आवळकाठी आहे.

आवळा तेल- “आवळा केश तेला’च्या जाहिराती आपण वाचतो. घरच्या घरी आवळा तेलही सहज करता येते. ताज्या आवळ्याचा रस 3 भांडी, 1 भांडे खोबरेल तेल मिसळून एकत्र उकळत ठेवावे. अग्नी मंद ठेवावा. तेल शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करावा.

तेल उकळताना छान वास सुटतो. तेल थोडे गार होत आल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवावे. हे तेल केसांच्या मुळाशी चोळून लावावे. डोके शांत राहते, केस पिकत नाहीत, केस दाट होतात. हे तेल त्वचेला चोळून लावल्याने, अभ्यंग केल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्वचेचा गरमपणा कमी होतो. आठवड्यातून एकदा आवळ्याचा ताजा रस केसांच्या मुळांशी चोळून लावावा व नंतर डोक्‍यावरून स्नान करावे. केस मऊ व चमकदार होतात.

आवळ्यांचा रस रोज एक चमचा घ्यावा. यात सी व्हिटॅमिनही भरपूर प्रमाणात आहे. याने दात, डोळे, नखे, त्वचा निरोगी होतात. हृदय विकारावर आवळा गुणकारी आहे, तसेच रक्‍तवाहिन्यांचे विकार आणि विशेष करून डोळ्यांना उपयोगी आहे. कावीळ, पण्डुरोग यातही आवळा विशेष उपयोगी आहे. कल्पवृक्षासम आवळ्याची आज आपण माहिती घेतली. आवळ्याचा रस आणि तिळाचे तेल घालून केलेले आवळ्याचे तेल अभ्यंगासाठी (मसाज)साठी उत्तमच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)