निरोगी जीवन हीच खरी संपत्ती – आ. जयदत्त क्षीरसागर

बीड – शरिराने साथ न दिल्यास कितीही सपंत्ती असेल तर ती गौण ठरते. त्यामुळे निरोगी जीवन हीच खरी संपत्ती असून नागरिकांनी धावपळीच्या जीवनात शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीररसागर यांनी केले.

येथील शिवाजीनगर भागात रविवारी डी. राज फिटनेस सेंटर्सचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, कृउबा सभापती दिनकर कदम, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, नगरसेवक विनोद मुळूक, अजिंक्‍य चांदणे, ऍड. शेख शफिक, स्वप्नील गलधर, नितीन धांडे, ऍड. सुभाष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. क्षीरसागर म्हणाले, मन अन्‌ मनगट मजबूत असेल तर अपयशाची भीती रराहत नाही. त्यासाठी वेगवेगळे छंद जोपासण्याबरोबरच व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे. माणसाच्या आयुष्यात छोटी- मोठी संकटे येत असतात; पंरतु न डगमगता त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक असते. शेख खाजा, खमर अली खान, राहुल वाईकर, प्रा. बापूसाहेब शिंदे, विक्रम बिडवे, हेमंत कवठेकर, गहिनीनाथ थोटे, सचिन कोटुळे, मधुकर कोटुळे, डॉ. रमेश शिंदे, नाना मस्के, दत्ता लांडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)