निरेत संत सेना महाराजांना अभिवादन

नीरा- नीरा (ता. पुरंदर) येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. येथील विट्टल-रूक्‍मिणी मंदिरात पंचक्रोशीतील नाभिक समाजातील बांधवांनी एकत्र येऊन महाप्रसादाचे आयोजन केले होते. सकाळी विठ्ठल-रूक्‍मिणी मुर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सत्यनारायणाचे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम पार पडला. नीरा नाभिक संघाचे अध्यक्ष संतोष रणदिवे यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे सदस्य गोरख माने, माजी उपसरपंच कल्याण जेधे, नंदकुमार काश्‍वेद, संदीप गायकवाड, योगेश राऊत व प्रमोद गायकवाड समवेत पिंपरे खुुुर्द, गुळुंचे, राख, निंबूत या गावातील नाभिक समाजातील नागरिक उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)