निरेत रामनवमी उत्साहात साजरी

नीरा- नीरेत रविवारी (दि. 25) विविध मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरांना मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नीरा येथील प्रभाग क्रमांक 3मध्ये सचिन घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर, प्रभात 1मधील डॉ. विवेक वैद्य यांच्या येथील समर्थ मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच नीरेतील ग्रामस्थ व तरुणांच्या वतीने हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी मोठी शोभायात्रा काढली होती. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांच्या हस्ते शोभा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या उत्साहात तरुणांनी या यात्रेत सहभाग घेतला. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)