निरेत मटका चालवणाऱ्या दोघांवर कारवाई

नीरा- नीरा परिसरात बेकायदा मटका चालवणाऱ्या दोघांना शनिवारी (दि. 1) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीरा येथील बसस्थानकाच्या भिंतीलगत अभिजित महामुलकर व दीपक काळे हे दोन मटका बुकिंग घेत होते. पोलिसांनी अचानक धाड टाकून या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील 1610 रुपये व मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ते कल्याण मटका या नावाने मटका बुकिंग घेत होते. याबाबत किसन भानुदास कांतोडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारीसंतोष अर्जुन व दीपक वारोळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)