निरेत बंधारे पडले कोरडे ठणठणीत

परतीच्या पावसाने दिली हुलकावणी

नीरा- कायम दुष्काळी परिस्थीतीशी सामना करणाऱ्या पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्याला परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. गेल्या दोन वर्षांत सतत दुष्काळ पडल्याने बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. तर विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर होऊ शकतो असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पुरंदर तालुक्‍यातील राख, कर्नलवाडी, वाल्हा गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडी, नव्या निर्माण झालेल्या सुकलवाडी, वाघदरवाडी सह वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनता चालला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. ऐन हंगामात विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकऱ्यांसमोर पुढील काळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी काढणी सुरू आहे. पुढील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभऱ्याची पेरणी करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी कांदा लागण केली आहे. पण अजूनपर्यंत पावसाने हुलकावणी दिल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
पावसाळ्यापूर्वी वळावाच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती. पण मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने व नंतर परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गतवर्षी पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यात सरासरीच्या तुलनेत साठ टक्के पाऊस झाला होता. त्याचा परिणाम जानेवारीलाच जाणऊ लागला होता. तशीच काहीशी परिस्थिती आज जाणवत आहे. वाल्हे गावच्या पूर्वेकडील रेल्वेलाईन जवळचे तळ, राख येथील फांज ओढ्यावरील बंधारा, ब्रिटिशकालीन तलाव तसेच नावळी खिंडीतील व कर्नलवाडी व राख गावच्या हद्दीतील एकाही तलावात किंवा बंधाऱ्यात पाणी दिसत नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)