निरवांगी आरोग्य केंद्रांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण

निमसाखर- निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 31 बुथमधून सुमारे 3 हजार लाभार्थींना पोलिओ डोस देण्यात आला. ऊस तोडणी कामगारांची मुले आणि भटक्‍या जमातीतील व्यवसायीकांची मुले यांचा यामध्ये समावेश होता, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली. निरवांगी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या निमसाखर, दगडवाडी, रणगांव, खोरोचीसह अनेक गावात पल्स पोलिओचा उपक्रम राबविण्यात आला. यानंतर आरोग्य व इतर कर्मचाऱ्यांनी पोलिओ लसीकरणाचे चोखपणे बजावले याबद्दल वैदयकिय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन आभार व्यक्त केले. गावातील आशा व अंगणवाडीच्या ताई घरोघरी फिरुन सकाळच्या वेळी बालकांना डोस पाजत होत्या. यानंतर दुपारी वाड्यावस्त्या, ऊस तोडणी मजुरांच्या मुलांनाही खोप्यावर तर तोडणी क्षेत्रावर जाऊन या आरोग्य कर्मचाऱ्यांनी डोस पाजले. वैद्यकीय अधिकारी, सहा पर्यवेक्षक, तीस कर्मचारी यांनी पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. महाजन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)