निरवांगीत अवैध वाळू उपसा जोमाने

निमसाखर- निरवांगी (ता. इंदापूर) येथील गावालगत असणाऱ्या नीरा नदीत कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यालगत बेसूमार वाळू उपसा जोमाने सुरू आहे. तर या अवैध वाळू उपशाला रोखण्याला तालुका तहसील कचेरी कमी पडत असून याला महसूल खात्याबरोबरच पोलीस खातेही तितकेच जबाबदार आहेत. तसेच काही मंडळींकडून मलीदा प्रवृत्तीमुळेच कारवाई होत नसल्याची या भागात चर्चा आहे.
इंदापूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागाला नीरा नदीमुळे या भागातील शेतीला मोठा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांला वरदान असलेलल्या या नदीला मात्र वाळू माफियांनी घेरले आहे. निरवांगी येथील नीरानदीत गेली अनेक महिने बेकायदेशीरपणे दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे. यामुळे नदी पात्राची वाळुचा अवैधरीत्या उपसा करुन ठिकठिकाणी टाकाऊ वाळूचे ढिगारे उंचच्या उंच पहायला मिळत आहे. या नदीच्या पात्रातून लाखो रुपयांची वाळूचा उपसा यापुर्वीही झाला असून आताही तो जोमाने सुरू आहे. या गावापासून काही अंतरावर नदीवर कोल्हापूरी पद्धतीचा बंधरा पहावयास मिळतो.वाळू माफिया आता तर या बंधाऱ्यालगतच उपसा करू लागले आहेत. यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. असे मत या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या नदीच्या पात्रातून दररोज लाखो रुपयांची वाळूचा उपसा झालेला आहे व होत ही आहे. दिवस रात्र बिनधास्तपणे वाळू उपसा होत असताना संबंधित इंदापूर महसूल विभागने कारवाई करणे गरजेचे होते. नदीच्या पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून नदीचा प्रवाही बदला असल्याने शेतकऱ्यांना ही धोका निर्माण होऊ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे या वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

  • महसूल व पोलीस यंत्रणा सुस्त?
    निरवांगी येथे तलाठी कार्यालयचे बांधकाम करण्यात आले आहे मात्र, हे कार्यालय कार्यालय नसून शेभेची वास्तू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सराफवाडीतून अनेक वर्षांपासून कामकाज सुरू आहे. निरवांगी येथे तलाठी कार्यालयाचे काम सुरू झाल्यास वाळूच्या वाहतुकी बरोबरच उपशावर ही लक्ष राहील असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. असे असले तरी या भागातील महसूल खात्याच्या काही मंडळींचा चिरीमिरीचा धंदा थांबणार कधी ? असा सवाल ही नागरिकांनी विचाराला आहे. याचबरोबर माळशिरस (जि. सोलापूर) या भागातील पोलीस व महसूल खाते कारवाईच्या बाबतीत जोमात आहे, तर इंदापूरचे महसूल व पोलीस यंत्रणा सुस्त असल्याचे बोलले जात आहे.
  • अवैध वाळू वाहतूक आणि उपशावर कारवाई करताना अनेक अडचणी येतात. यात नागरिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दुर्दैव आहे. तरी यावर तोडगा काढून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. तरी प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य मिळणे अपेक्षीत आहे.
    श्रीकांत पाटील, तहसीलदार, इंदापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)