निरगुडी येथील शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

फलटण – निरगुडी, ता. फलटण येथील एका शेतकऱ्याने भेंडीची बि न उगवल्यामुळे विक्रेत्याकडे व कृषी अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने कृषी दुकानात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल तक्रार अर्जानुसार व अन्यायग्रस्त शेतकरी यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार, मौजे निरगुडी येथील शेतकरी गोरख लालासो सस्ते यांनी दिनांक 12 ऑक्‍टोबरला फलटण येथील चंद्रशेखर पवनलाल दोशी (वाकडमाने) यांच्या बी बियाणे दुकानातून भेंडीचे बी 2300 रुपयाचे दीड किलो खरेदी केले होते. त्यानंतर शेतकऱ्याने बी टोकण पद्धतीने व नंतर पाणी देऊन लागवड केली परंतु अनेक दिवस होऊनही भेंडीचे बी उगवले नाही.

-Ads-

याबाबत दुकानदार चंद्रशेखर पवनलाल दोशी (वाकडमाने) यांच्याशी दुकानात प्रत्यक्ष भेटून भेंडीचे बी उगवले नाही असे सांगितले व संबधित कंपनीस कळवून प्रत्यक्ष शेतात भेट देऊन झालेला मजुरी खर्च व झालेली नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली. परंतु, दुकानदाराने दाद दिली नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांनीही दखल घेतली नाही. यामुळे निराश झालेल्या गोरख सस्ते यांनी विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)