निरगुडसर येथे शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

मंचर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रार दाखल

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणा सुरू असतानाच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यावेळी मारामारी होवून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी घडली. मंचर पोलिसांचा निरगुडसर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावी त्यांच्या बंगल्यानजीक शिवसेना शाखा कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे समर्थक आले होते. शाखा कार्यालय उद्‌घाटन आणि काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचे समर्थक शिरुर येथे नियोजित कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. त्यानंतर उपस्थित वळसे पाटील आणि आढळराव पाटील समर्थकांनी नेत्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
त्यांनतर समोरासमोर कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी झाली. यामुळे वातावरण एकदम तणावग्रस्त झाले होते. या घटनेत काही मागासवर्गीय कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. निरगुडसर गावात झालेल्या दोन पक्षीय कार्यकर्त्यांमधील भांडणामुळे वातावरण नियंत्रणाखाली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाहेर गावातून भाडोत्री गुंड आणले होते. गावात फुस लावून येथील दलित बांधवांमध्ये भांडणे लावली. मारामारी करुन अत्यंत खालच्या पातळीवरचा प्रकार घडवून आणला आहे. याचा निरगुडसर ग्रामस्थांनी निषेध केला आहे.
    दादाभाऊ टाव्हरे, उपसरपंच, राष्ट्रवादी कॉंग्रेस.
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावगुंडी करुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माराहाण करण्याचा केलेला प्रयत्न निंदणीय आहे. लोकशाहीमध्ये आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी जरी बाहेरगावी असलो तरी सर्व माहिती घेवूनच मी जबाबदारीने बोलतो. प्रामाणिकपणे पोलिसांनी कारवाई करुन न्याय द्यावा, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल.
    रविंद्र वळसे पाटील, माजी उपसरपंच, शिवसेना.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)