निरगुडसर येथे भजनी मंडळांना साहित्यांचे वाटप

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने भजनी मंडळांना धार्मिक साहित्याचे वाटप करण्यात आले.जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व पंचायत समितीच्या माध्यमातून निरगुडसर गावातील देशमुख वस्ती, दांगट मळा, वळसे मळा येथील भजनी मंडळाना धार्मिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्याचे वाटप मंदा प्रताप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच उर्मिला वळसे पाटील, उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्या प्राजक्‍ता वळसे पाटील, सदस्य आनंद वळसे पाटील, शरद वळसे पाटील, शांताराम उमाप, बजरंग महाराज दांगट, शिवाजी दांगट, कारभारी दांगट यांच्यासह ग्रामस्थ आणि भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)