निरगुडसर येथे दत्त जयंतीनिमित्त मिरवणूक

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि. 22) दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी भजन म्हणत पालखीमध्ये ठेवलेल्या दत्ताच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. गावप्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आली. यावेळी दत्त मंदिरासमोर झालेल्या प्रवचनात पंकज महाराज गावडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात किरण वळसे पाटील, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच थोरात मळा येथे दिडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने दत्तजयंती सोहळा संपन्न झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)