निरगुडसर येथे गॅस कनेक्‍शनचे वाटप

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर येथे शुक्रवारी (दि. 19) प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्‍शन वाटप तसेच ग्रामअभ्यासिकेचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती उपसरपंच शामराव टाव्हरे यांनी दिली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून (शाहू फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका) अंदाजित रक्‍कम 33 लाख 50 हजार रुपये खर्च करून ग्रामअभ्यासिका उभारणार आहे.
ग्रामपंचायत निधीतून 15 टक्‍के मागासवर्गीय निधी व तीन टक्‍के अपंग कल्याण योजनेअंतर्गत वस्तूवाटप तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्‍शन वाटप पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीच्या सभापती उषा रमेश कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले यांच्याहस्ते श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर येथे सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)