निरगुडसरप्रकरणी 25 जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील निरगुडसर येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमचक्रीप्रकरणी 39 जणांवर आणि इतर 25 जणांवर जातीवाचक शिविगाळ आणि दंगल केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांतील प्रमुखांनी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, विद्यमान सरपंच उर्मिला वळसे पाटील, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणपत वळसे पाटील, माजी उपसरपंच रविंद्र वळसे पाटील यांच्या पत्नी मनिषा वळसे पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत गावात परिस्थिती शांत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंचर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित शिवसेनेचे कार्यकर्ते अमर नामदेव गायकवाड यांनी म्हटले आहे कि, निरगुडसर येथे शिवसेना शाखा कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी आम्ही सर्व शिवसैनिक येथे जमलो होतो. त्याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदीप प्रताप वळसे, रामदास पांडुरंग वळसे, राहुल झुंजारराव हांडे, विश्‍वास भिकाजी गोरे, मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे, संदीप वळसे, संतोष बापूराव वळसे, संदीप सदाशिव टेमकर, संतोष महादू टाव्हरे, विकास बाबाजी टाव्हरे, उदय हंबीराव हांडे, अक्षय बाळासाहेब थोरात, शुभम अंबादास भोंडवे, ज्ञानेश्‍वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही), प्रमोद दिनकर वळसे, शाम तुळशीराम टाव्हरे, धीरज हांडे, वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे, संजय गोरे, तुषार सोपान टाव्हरे, सतोष दत्तात्रय मेंगडे, मंदाकिनी वळसे, उर्मिला वळसे पाटील यांनी येवून मला आणि मित्र महेश गणपत राऊत, विकास महादू कडवे यांच्याकडे बोट करुन जातीवाचक शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे करीत आहेत.
मंचर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम उमाप यांनी म्हटले आहे कि, वसंत वळसे यांच्या घरासमोरील ग्रामपंचायतीने लावलेली झाडे वसंत वळसे, विशाल वळसे आणि विकास वळसे यांनी तोडली असल्याचे समजले. त्यावेळी मी आणि माझ्यासोबत असलेले चंद्रकांत गायकवाड यांनी झाडे का तोडली? याचा जाब वसंत वळसे यांना विचारला. त्यावेळी तेथे शिवसेना शाखा उद्‌घाटन कार्यक्रमप्रसंगी आलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते अरुण गिरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चेतावणी देवून तुम्ही कोणाला घाबरु नका.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगून ते पुढील कार्यक्रमासाठी गेले.
त्यानंतर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणपत वळसे पाटील, मनिषा वळसे, राजेंद्र वळसे, रेश्‍मा वळसे, वसंत वळसे, अलका वळसे, विशाल वळसे, विकास वळसे, विद्या वळसे, अमर गायकवाड, विकास कडवे, महेश राऊत, वैभव किरे, राजेंद्र पंचरास (त्याचे पूर्ण नाव माहित नाही) आणि इतर तेथे जमलेले 20 ते 25 जणांनी मला आणि माझ्यासोबत असणारे उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांच्या अंगावर धावून जावून धक्‍काबुक्‍की केली. तसेच जातीवाचक शिविगाळ केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)