निरगुडसरचे माजी विद्यार्थी भेटले थापलिंग गडावर

मंचर- निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील मार्च 1983 च्या बॅचचे 10 वीचे विद्यार्थी 35 वर्षानंतर नागापूर येथील थापलिंग गडावर एकत्र आले होते, यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.मंचर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी, पेठ येथील श्री वाकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक वळसे पाटील, मुंबई येथील अनिल ठाकरे, निवृत्त सैनिक वसंत टाव्हरे, चाकण येथील टेटा पॅक कंपनीचे उद्योजक सुरेश शिंदे, मुंबई नेरुळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, दिलीप टाव्हरे, प्रगतशील शेतकरी सुरेश खिलारी, दत्तात्रय खिलारी, अण्णा गवारी, उद्योजक सूर्यकांत मेंगडे, अनुसया घाडगे आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांची शिस्त, अध्यापन कौशल्य, प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण, ठिगळ लावलेली खाकी पॅण्ट, फाटलेला पण सुईने शिवलेला मांजरपाट किंवा टेरिकॉटचा शर्ट, डोक्‍यावरगांधी टोपी, मित्र-मैत्रिणी यांच्यातील भांडणे, गटतट, गावातील मुख्य चौकात रात्रीच्या वेळी 16 एम.एम पडद्यावरील जुने मराठी-हिंदी चित्रपट जमिनीवर बसून पाहण्याचा आनंद असे विविध प्रकारचे अनुभव कथन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. निर्मला वळसे पाटील व अश्‍विनी मेंगडे यांनी यावेळी माजी विद्यार्थी मेळाव्याची गरज यावर मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)