निरगुडवाडी रस्ता उखडल्याने वाहतूक बंद

माळेगाव – वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व पाटबंधारे कार्यालयामागून निरगुडवाडी मार्गे होळ गावाकडे जाणारा रहदारीचा रस्ता आपल्या हद्दीत येत असल्याच्या कारणावरून एकाने खोदून ठेवला आहे. यामुळे यामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे शिखर शिंगणापुरच्या दिशेने जाणाऱ्या मानाच्या तेल्या भुत्या कावडीचा यामार्गे होणारा प्रवास यंदा खडतर होणार आहे.

नीरा-बारामती मार्गावरील पाटबंधारे कार्यालयामागुन डावा कालव्याच्या अकरा फाट्यालगत सुरू होणारा मार्ग सदोबाचीवाडी गावच्या हद्दीतून होळ मार्गाकडे जातो. यामध्ये सुमारे एक किलोमिटरच्या अंतराचा रस्ता आहे. पोलीस ठाणे वसाहती मागच्या बाजुला सुमारे 500 मिटर रस्ता डांबरीकरण केला आहे. नीरा-बारामती मुख्य मार्गावरून सदोबाचीवाडी गावच्या हद्दीतील नीरगुडवाडी व होळ गावठाणकडे जाण्यासाठी या मार्गाचा नागरीकांना उपयोग होतो. गेल्या अनेक वर्षांपासुन रस्ता वहीवाटीचा असल्याचे येथील रहिवाशांचे मत आहे.
यामध्ये डांबरी रस्ता आल्याने तो रस्ताही खोदण्यात आला आहे. अनेक वर्षांपासुन वापरात असलेला व सरकारी नीधी खर्च करून केलेला रस्ता एकाने मालकी हक्क सांगत उखडल्याने वाहतूक बंद पडली आहे. या रस्त्यावरून अवजड किंवा मोठी वाहने जात नाहीत. दुचाकी व पायी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. गेल्या अनेक वर्षांपासून याच मार्गावरून तेल्या भुत्याची कावड पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते व पुढे शिखर शिंगणापुरला जाते. कावडी व त्यांच्या सोबतची वाहने ही रस्त्यानेच जातात. मात्र, आता खोदकाम करून रस्ताच उखडल्याने येथुन वाहने जाणे शक्‍य नाही. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून रस्त्याचा प्रश्‍न मिटवावा, अशी मागणी नागरीक करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)