निरंतर अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल

file photo

कोल्हार खुर्द – निरंतर अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो, असे मत कोल्हार खुर्द येथे रयत शिक्षण संस्थेच्या रयत टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी सरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रयत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 7700 विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्तर विभागातील नगर, बीड, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांतून 165 विद्यार्थी गुणवत्ता यादीत पास झाले. यापैकी कोल्हार न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे 10 विद्यार्थी चमकले. यापैकी 7 विद्यार्थी हे कोल्हार खुर्दचे आणि जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. यामुळे कोल्हार खुर्दचे नाव रयत शिक्षण संस्थेच्या पटलावर झळकले असल्याने या विद्यार्थ्यांचा कोल्हार ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने संयुक्त सत्कार आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच प्रकाश पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका झिने एस. बी., पठारे व्ही. एस., पवार आर. व्ही., तांबे एस. जी., शिंदे ए. के., शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर घोगरे, रयत शाळेचे शिक्षक एस. सी. खंडागळे, एस. के. सोनावणे, राजेंद्र लोंढे, गोपीनाथ दळे, महिपती शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी पी. एस. गोसावी, आदींनी यशस्वी विद्यार्थी तनुजा शिरसाठ, पल्लवी लावरे, श्रेया खंडागळे, श्रुती खंडागळे, प्रणव दळे, स्नेहल चांडोले, विकास शिरसाठ, हेमंत चौरे, साक्षी भोसले, सिद्धांत काळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तसेच, या यशात रयत शाळेच्या शिक्षकांचाही मोलाचा वाट असल्याने त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन एस. जी. तांबे यांनी केले, तर आभार एस. बी. झिने यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)