निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान

रहिमतपूर : स्वच्छता मोहिमेत सहभागी निरंकारी ब्रॅंचचे सदस्य.

रहिमतपूर, दि. 25 (प्रतिनिधी) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या 65व्या जयंती निमित्त संपूर्ण भारत देशामध्ये 350 शहरातील 765 रुग्णालयामध्ये स्वच्छता अभियान राबवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त एकाचवेळी संपूर्ण भारतभर सरकारी रुग्णालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाठार किरोली निरंकारी ब्रॅंचच्या वतीने शंभरपेक्षा जास्त सेवादल जवान व बहनजी यांनी सहभाग घेऊन रुग्णालयाचा परिसर स्वच्छ केला. या मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपांकर चंद्रकापुरे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विकास गायकवाड, माजी सरपंच सिताराम गायकवाड, ब्राच मुखी निवास पवार, सेवादल अधिकारी शशिकांत मांडवे, सेक्रेटरी रमेश नलवडे, उद्धव राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी सिताराम गायकवाड यांनी निरंकारी मंडळाच्या उपक्रमाचे कौतूक करीत निरंकारी मंडळ अध्यात्मीक जागृती बरोबर समाजात स्वच्छता, रक्तदान शिबीर आयोजीत करून समाजाला सामाजिक सलोख्याचा संदेश देत आहे. निरंकारी मंडळाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)