निरंकारी भवन हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात?

अमरिंदर यांनी केले सूचित: ते दहशतवादी कृत्यच

अमृतसर –
पंजाबमधील निरंकारी भवनावर झालेला ग्रेनेड हल्ला म्हणजे दहशतवादी कृत्यच असल्याचे सोमवारी त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले. त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी हात असल्याचेही त्यांनी सूचित केले. रविवारी दुचाकी वरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी निरंकारी भवनावर ग्रेनेडचा मारा केला. त्या हल्ल्यात तिघे मृत्युमुखी पडले, तर 20 जण जखमी झाले. त्या हल्ल्यानंतर अमरिंदर यांनी काही ज्येष्ठ मंत्र्यांसह निरंकारी भवनाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमरिंदर यांनी हल्ल्यावरून पाकिस्तानकडे बोट केले.

पाकिस्तानी लष्कराच्या दारूगोळा कारखान्यात ज्या प्रकारच्या ग्रेनेडचे उत्पादन होते; तशाच प्रकारचा ग्रेनेड हल्ल्यासाठी वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. पंजाब पोलिसांनी मागील महिन्यात एक दहशतवादी जाळे उघडकीस आणले. त्यावेळी एचजी-84 ग्रेनेड जप्त करण्यात आले. तशाच प्रकारचा ग्रेनेड हल्ल्यासाठी  वापरण्यात आला.

-Ads-

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा पाठिंबा असणाऱ्या खलिस्तानी किंवा काश्‍मिरी दहशतवादी गटांचा हल्ल्यामागे हात असावा असे दिसते. हल्ल्यासंदर्भात काही धागेदोरे हाती आले आहेत. लवकरच हल्लेखोरांना अटक होईल, असे अमरिंदर यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) ग्रेनेड हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. एनआयएच्या पथकाने रविवारी रात्री स्फोटकांच्या तज्ञांसमवेत निरंकारी भवनाला भेट दिली. त्या पथकाने हल्ल्यासंदर्भात पंजाब पोलिसांशी चर्चाही केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)