निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला 

अमृतसरमध्ये 3 ठार 10 जखमी : संपूर्ण राज्यात नाकाबंदी 

अमृतसर: पंजाबमधील अमृतसरजवळच्या राजासांसी गावामधल्या निरंकारी भवनावर आज दोन अज्ञातांनी बॉम्ब हल्ला केला. दुचाकीवर स्वार दोन अज्ञात लोक निरंकारी भवनाजवळ आले व त्यांनी त्यांच्याकडचे ग्रेनेड निरंकारी भवनाच्या आत फेकले. ग्रेनेडच्या स्फोटांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवनात आज सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. याप्रसंगी येथे सुमारे 200हून अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता. तसेच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्‍यता पंजाब पोलिसांनी वर्तविली आहे. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय काश्‍मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने यापूर्वीच दिल्ली पोलिसांना दिली होती. तसेच जैश-ए-मोहम्मदचे 6-7 अतिरेकी फिरोजपूरला आले असून ते हल्ल्याचे षडयंत्र रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले, पंजाबमधील शांततेचे वातावरण भंग करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधावा आणि सज्ज राहावे, असेही जाखड म्हणाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)