नियार्तीला चालना देण्यासाठी ऍपचा वापर

मुंबई: वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाकडून निर्यात मित्र नावाच्या ऍपचे सादरीकरण करण्यात आले आहे.
या ऍपच्या वापराने देशी आणि विदेशी व्यवहार करण्यात सोपे होणार, असून यांचा फायदा निर्यात क्षेत्राला होणार आसल्याची माहिती वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

या ऍपची निर्मिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशन (फियो) यांनी तयार केले आहे. तर हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. तर याच्या वापरातून एक्‍सपोर्ट आणि इम्पोर्ट जीएसटी दर बाजारातील चालू असलेल्या किंमती व व्यापाराशी संबंधित असणारी माहिती मिळणार आहे. आयटीसी एचएस कोडचे मूल्यमापन करता येणार असून सध्या या ऍपमध्ये 87 देशांचा डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपन्याचा सहभाग या ऍपच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे. यातून लोकांचा व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)