नियम सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे

पुणे – गणेशोत्सव काळात ठराविक उंचीनंतर शहरात बॉक्‍स कमानींना परवानगी देण्यात यावी, त्याचबरोबर उत्सवादरम्यान पाच दिवस ध्वनीक्षेपक सुरू ठेवण्याला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मुख्य शहरांचे महापौर, राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर टिळक यांनी पुण्यातील गणेशोत्सवासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. गणेशोत्सवादरम्यान, कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ठराविक उंचीनंतर मंडळांना बॉक्‍स कमानींसाठी परवानगी देण्यात यावी, या प्रमुख मागण्या टिळक यांनी केल्या.

-Ads-

पुणे पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेश मंडळांना बॉक्‍स कमानीसाठी परवानगी देण्यास मनाई केली होती. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. त्यातच, गर्दीपुढे साध्या कमानी टिकणार का, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या मंडप धोरणानुसार ठराविक कमानी घालण्याला परवानगी असताना, पोलिसांनी बंधने टाकण्याचे कारण काय? तसेच, जमिनीपासून ठराविक उंचीवर बॉक्‍स कमानीसाठी परवानगी दिली जाते; मात्र यंदाच त्यावर निर्बंध कशासाठी असा प्रश्‍नदेखील पोलीस अधिकाऱ्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत विचारला होता. त्यावर मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)