नियम मोडणाऱ्यांकडून बारा कोटी वसूल

रेल्वे प्रशासनाची कारवाई : 1 लाख 13 हजार प्रवासी विनातिकिट

पुणे – रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांमधून फुकट प्रवास करणे तसेच नियम मोडणाऱ्या प्रवाशांकडून आतापर्यंत 12 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून ही रक्‍कम गोळा करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे-मळवळी, पुणे-बारामती आणि पुणे-मिरज तसेच मिरज-कोल्हापूर या मार्गांवर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ही तपासणी केली आहे. यामध्ये 1 लाख 13 हजार प्रवासी हे विनातिकिट आढळून आले. त्यांच्याकडून दंड स्वरुपात 6 कोटी 24 लाख रुपये गोळा केले आहेत. याशिवाय, रेल्वे रुळ ओलांडण्यासह इतर नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अप्पर मंडळ रेल प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबवली. गेल्यावर्षी याच कालावधीत राबविण्यात आलेल्या कारवाईमध्ये 11 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)