नियम पाळूनही वेळेत पोहोचता येते!

कात्रज-शिवाजीनगर मार्गावर वाहतूक पोलिसांचा अनोखा प्रयोग
– नियम न पाळता काढली दहा किलोमीटर अंतराची वेळ

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि.4 – “प्रचंड वाहतूक असल्याने इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केले जाते,’ हा समज वाहतूक पोलिसांनी खोटा पाडला आहे. यासाठी कात्रज ते शिवाजीनगर या 10 किलोमीटरच्या अंतरावर एक अनोखा प्रयोग राबवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांनी यामध्ये दोन दुचाकींवर प्रत्येकी दोन कर्मचारी देत एकाला वाहतुकीचे नियम न पाळता; तर एकाला वाहतुकीचे नियम पाळून किती वेळ लागतो, याचे मोजमाप केले. या प्रयोगात वाहतुकीचे नियम पाळणारा पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा फक्त चार मिनिटे कमी वेळात इच्छित स्थळी पोहचला. हा प्रयोग ऐन गर्दीच्या वेळी करण्यात आला. त्यामुळे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, हे पोलिसांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

कात्रज चौक भाजी मंडई ते शिवाजीनगर चौक सिमला ऑफिस असे दहा किलोमीटरचे अंतरावर हा प्रयोग केला केला. यासाठी मार्गावरील वाहतूक कर्मचाऱ्यांस सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे वाहतूक नियम मोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यास थांबवण्यात आले नाही. सकाळी साडेदहा वाजता कात्रज येथून निघालेला कर्मचारी नियम न पाळता 24 मिनिटांत, तर नियम पाळणारा 28 मिनिटांत पोहचला. या प्रयोगावरुन वाहनचालक नियम पाळून इच्छितस्थळी वेळेवर व सुरक्षित पोहचू शकतात, हे वाहतूक पोलिसांनी दाखवून दिले. हा प्रयोग वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, संपतराव भोसले, ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला गेला. तर वाहन चालक म्हणून पोलीस नाईक बाठे, गिरमे , चौधरी व पोलीस शिपाई शिंदे सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)