नियम पाळा, अपघात टाळा – संग्राम चौगुले

चिंचवड – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि वाहतूक विभागाच्या जनजागृती अभियान कार्यक्रमात आंतर राष्ट्रीय शरीर सौष्ठव पटू संग्राम चौगुले यांनी “नियम पाळा, अपघात टाळा’ असा विद्यार्थ्यांना संदेश दिला.

मानद सरचिटणीस ऍड. राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया, शरीर सौष्ठव पटू संग्राम चौगुले, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे कार्यक्रमास उपस्थित होते. “सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरीत दिल्या.

संग्राम चौगुले म्हणाले, आनंदी जीवन जगण्यासाठी शरीर आणि मन निरोगी असणे गरजेचे आहे. अभ्यास व आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. त्यामुळे तुमचे व इतरांचे आयुष्य धोक्‍यात येणार नाही. ज्या शाळेत आपण घडतो, शिकतो त्या शाळेचे आपण ऋणी राहिले पाहिजे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पाटील म्हणाले, मुलांच्या हातात गाडी लवकर देणे, हा मुलांचा नव्हे, तर आई-वडिलांचा दोष आहे. वाहन चालवताना जीवन सुरक्षित राहावे, यासाठी हेल्मेट घालणे गरजेचे आहे. गाडी चालविताना मोबाईलचा वापर करू नये. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे यांनी वाहतुकीचे नियम पाळत असताना वाहतूक व्यवस्थापनाची उदाहरणे दिली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हिंदुराव कलंत्रे प्रास्ताविकात म्हणाले, जबाबदार नागरीक बना, व्यसने टाळा म्हणजे अपघाताचे प्रमाण कमी होईल.

विक्रम काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उप प्राचार्य कृष्णा विश्‍वासराव यांनी आभार मानले. प्रा. सरिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. साधना कटारिया, प्रा. मंजुश्री बनकर यांनी नियोजन केले. यावेळी विभाग प्रमुख चारुशीला वांजळे, प्रा. सुनिता नवले, प्रा. मधुकर लवटे, प्रा. प्रणिता बोबडे व विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)