नियम पाळाल तर गुलाब, नाही तर कारवाई

 वाहतूक नियम तोडणाऱ्या 4,738 जणांना दंड


रस्ते सुरक्षा अभियानाच्या आठवडाभरात कारवाई

पुणे- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करुन देखील नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी थेट दंड आकारणी सुरू केली आहे. विशेषत: गेल्या 6 दिवसांत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना भेट म्हणून गुलाब तर, न पाळणाऱ्या 4 हजार 738 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

अपघात टाळण्यासाठी 23 एप्रिल ते 7 मेदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. वाहतूक नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. वाहतूक शाखेतर्फे गेल्या 6 दिवसांत विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती, रिक्षाचालकांना जागृतीपर मार्गदर्शन, रस्तावरुन जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांना रिफ्लेक्‍टर लावणे, हेडलाईट्‌स तपासणे तसेच चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. सिग्नलवर कवायतीच्या माध्यमातून लोकांसमोर प्रात्यक्षिके सादर केली जातात. शनिवारी डेक्कन वाहतूक विभाग, कोरेगाव पार्क वाहतूक विभाग, खडकी वाहतूक विभागाकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यासाठी कोरेगाव पार्क वाहतूक पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील जे. एन. पेटीट, बॉईज हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या हातात फलके देऊन लोकांमध्ये वाहतूक नियमनाविषयी जनजागृती केली.
यामध्ये एकूण 500 विद्यार्थी तसेच पालकांनी सहभाग घेतला. नियम पाळणाऱ्यांना गुलाब पुष्प दिले जात आहे. परंतु एवढ्या प्रमाणात जनजागृती करुन देखील नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द मात्र कारवाई केली जात आहे.

मोडलेले नियम आणि कारवाईची संख्या

विनाहेल्मेट – 751
मोबाईल टॉकिंग – 517
ट्रिपल सीट – 370
सीसीटिव्ही – 3100


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)