नियम डावलून अभ्यास मंडळावरील नियुक्‍त्या

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळावरील नियुक्‍ती ही नियमबाह्य करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर उत्तरपत्रिका तपासणीत चुकांमुळे दोषी ठरविलेल्या प्राध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यास मंडळाच्या नियुक्‍त्यांवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

विद्यापीठाने वाणिज्य अभ्यास मंडळावर नियुक्‍त्या केल्या आहेत, ते नियम डावलून करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठाने एका प्राध्यापकाला उत्तरपत्रिका तपासणीत चुका केल्याने दोषी ठरविले होते व दंडही केले होते. त्या प्राध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याचे डॉ. मनोहर सानप यांनी लेखी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळावरील सदस्यांसाठी शुक्रवार अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकूण 18 जागांसाठी 27 अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी शनिवारी (दि.11) होणार आहे. व्यवस्थापन शाखेच्या 9 पैकी 7 अभ्यास मंडळांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. वाणिज्यच्या एका अभ्यास मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या दोन्ही शाखेच्या दोन अभ्यास मंडळासाठी एकही अर्ज आले नाहीत. त्यामुळे प्रत्येकी दोन अभ्यास मंडळ असे चार अभ्यास मंडळ अर्जाअभावी रिक्‍त राहाणार आहेत. वाणिज्यच्या 6 अभ्यास मंडळांसाठी आता निवडणुका होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)